+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Feb 24 person by visibility 237 categoryआरोग्य
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ’परिसर भगिनी विकास संघटने’च्या साडेतीन हजार स्त्रियांचं नेतृत्व करणार्‍या वेगवेगळ्या इमारतींमध्ये जाऊन तेथील लोकांना सुक्या ओल्या कचर्‍याच्या विभागणीचे महत्त्व पटवून देणार्‍या कचरावेचक ते पर्यावरण रक्षक ठरलेल्या सुशीला साबळे यांना यंदाचा  कुसुम पारितोषिक जाहीर झाला.’अशी माहिती  आंतरभारती शिक्षण मंडळाच्या पल्लवी कोरगावकर, सुचिता पडळकर, तनुजा शिपूरकर, विनय पाटगावकर यांनी
  ५१ हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज पाटील यांच्या हस्ते रविवारी ११ फेब्रुवारीला वसंतराव चौगले पतसंस्था हॉल, शाहूपुरी येथे या पुरस्कार वितरण समारंभ आहे.  सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. प्रा. चंद्रकांत शंकर पाटगांवकर यांनी आयुष्यभर समतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे कार्य केले. यांच्या मृत्युपश्चात आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शिल्लक रक्कम सोपविली.
 सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आदी क्षेत्रात हिरिरीने भाग घेणार्‍या महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने कुसुम पारितोषिक देण्यात येते. चंद्रकांत पाटगांवकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी ही रक्कम संस्थेकडे सुपूर्द केली. त्याच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.  या कार्यक्रमासाठी जरूर यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.