+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे adjustजनतेशी विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा- सतेज पाटील adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !!
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Apr 24 person by visibility 55 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे ता.पन्हाळा या संस्थेच्या दूध उत्पादकांनी एच.डी.एफ.सी. बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी करनाल हरियाणा येथून तर जर्शी जातीच्या १५ गायी बेंगलोर कोलार येथून खरेदी केल्या.
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये त्या जनावरांचे दूध संस्थेच्या उत्पादकांना प्रदान केले. चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, ‘म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम गोकुळकडून दूध उत्‍पादक शेतक-यासाठी मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. गोकुळने २० लाख लिटरचे दूध संकलनाचे उद्दिष्टे ठेवले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यातून ते शक्य होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत दूध उत्पादकांनी जातीवंत म्हैशी खरेदी केल्या आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दूध उत्पादकांनकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच संघाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे.’
गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले व अमरसिंह पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर दूध उत्पादक राजाराम कळके यांनी दूध संस्थेला जास्त दूध पुरवठा केल्याबदल व एच.डी.एफ.सी.बँकेचे प्रतिनिधी संतोष नाळे त्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.
संघाचे सहायक व्यवस्थापक संकलन बी.आर.पाटील, अधिकारी डॉ.कडवेकर, धनंजय यादव, संजय पाटील, प्रकाश माने,डॉ. ईश्वर काटकर, माजी सरपंच विष्णू पाटील, राधाकृष्ण दूध संस्थेचे सुरेश कळके, पांडुरंग पाटील, विष्णू खांडेकर, लक्ष्मण कळके, धनाजी चोपदार,संदीप गुरव, महादेव माने, भिकाजी कांबळे उपस्थित होते.