+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Mar 24 person by visibility 125 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील स्मारकाचे व येथील विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (आठ मार्च) होत आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती आहे. दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक व प्रवेशव्दार उभारण्यासाठी २ कोटी ३८ लाख ६३ हजार रुपयांच्या रक्कमेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या निधीतून माणगाव येथील मुख्य प्रवेशद्वार, लंडन हाऊस, होलोग्राफिक शो व तक्क्या इमारत सुशोभिकरण इ. विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या लोकार्पण सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.