+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustओसांडणारा उत्साह, भारावलेली मनं ! कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावली, स्वप्नांना गती लाभली !! adjustशिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर, अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना पुरस्कार adjustकोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे adjustसहा ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान परिषद, डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर adjustकेआयटीत स्टुडंट इंडक्शन, प्रथम वर्ष विद्यार्थ्याना तज्ज्ञांचे मार्गदर्शन adjustदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे संविधानाचे खरे उपासक -साहित्यिक कृष्णात खोत adjustलेटेस्टच्या मिरवणुकीत अवतरणार रामराज्य सोहळा, पुष्पक विमानाचा चित्ररथ adjustन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये पदवी अभियांत्रिकी विभागाचे उद्घाटन दिमाखात adjust प्राध्यापकांच्या सुटाची सभा ठरली वादळी, घटना दुरुस्ती मंजूर-नामंजूरवरुन वादंग कायम adjustकागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो
1000926502
1000854315
schedule06 Sep 24 person by visibility 281 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  गुजरीतील प्रसिध्द कर सल्लागार कै.  अरुण विठ्ठल माने यांनी मृत्यूपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार २९ लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी येथील बालकल्याण संकुलास प्रदान केला. माने यांच्या कुटुंबियांतर्फे पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी रागिणी पाटील यांनी हा धनादेश संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.बी.पाटील, मानद कार्यवाह पदमजा तिवले उपस्थित होत्या.
 अरुण विठ्ठल माने हे कोल्हापुरात तब्बल ४० वर्षे कर सल्लागार म्हणून काम करत होते. समाजऋण मानून काम करणारे ते व्यक्तिमत्व होते. त्यांना कोणतेच अपत्य नव्हते. पत्नी रेखा माने यांचे कोरोना काळात निधन झाले. तेव्हापासून त्यांनी आपली मालमत्ता समाजातील चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या उपयोगी पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे साडू  पांडुरंग पाटील व कार्यालयीन सहकारी  कृष्णात वीर यांच्याकडे त्यांनी त्यासंबंधीचे अधिकार दिले होते. संस्थेच्या मानद कार्यवाह पदमा तिवले यांच्याशी पाटील यांचे जुने ऋणानुबंध असल्याने त्यांनी बालकल्याण संकुलास मदत करण्यास प्राधान्य दिले.  अरुण विठ्ठल माने यांचे २६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले. त्यानंतर सर्व प्रक्रिया करण्यासाठी कांही कालावधी गेला. पांडुरंग पाटील व कृष्णात वीर यांनी संपत्तीची विभागणी केल्यावर ती तपासण्यासाठी ॲड अजित कुलकर्णी यांची माने यांनीच नियुक्ती करून ठेवली होती. त्यानुसार ॲड कुलकर्णी व कृष्णात वीर हे बालकल्याण संकुलात गेले. त्यांनी संस्थेची पाहणी केली. या संस्थेत अनाथ निराधार, मुले-मुली व महिलांचे यांचे आयुष्य उत्तम पध्दतीने घडवले जात असल्याचे आणि आपण दिलेला पैसा तिथे योग्य कामासाठीच अत्यंत पारदर्शीपणाने वापरला जाणार असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटले व याच संस्थेला निधी देण्याचा निर्णय त्यांनी सर्वानुमते घेतला. बालकल्याण संकुलातील एका कक्षास दिवंगत अरुण विठ्ठल माने यांच्या पत्नी दिवंगत रेखा माने यांचे नांव देण्यात येणार आहे. निधी प्रदान कार्यक्रमास ॲड- अजित कुलकर्णी, कृष्णात वीर हे उपस्थित होते.