+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Jan 24 person by visibility 205 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्राचे नामवंत पैलवान हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचा भोगावती येथील कुस्ती मैदान पाहून येताना अपघात झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी एक लाख रुपये मदत करण्यात आली. दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हॉस्पिटलमध्ये  भेट देऊन त्यांची विचारपूस केली. 
क्षीरसागर यांनी त्यांना धीर दिला. यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याचेही ग्वाही दीनानाथ सिंह यांना त्यांनी दिली. अपघात झाल्याचे समजताच राजेश क्षीरसागर यांनी कार्यालयामधून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज पाठवला. त्यानुसार तातडीने निधी मंजूर करून पुढील उपचार करण्यात आले. सरकारने केलेल्या मदतीबद्दल दीनानाथ सिंह यांच्या नातेवाईकांनी आभार व्यक्त केले.यावेळेस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण उपस्थित होते.