+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Feb 24 person by visibility 150 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
सर्व प्रकारच्या सुपर स्पेशियलिटी वैद्यकीय सुविधा कोल्हापुरातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून सतत अग्रेसर असणाऱ्या अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सांगली परिसरातील ५५ वर्षीय रुग्ण अबरेच दिवस कालावधीपासून डायलेसिस उपचार घेत होता. आणि किडनी प्रत्यारोपण करणे हेच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गरजेचे होते. त्यांच्या पत्नीने त्यांना आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पतीसोबत आपण या आजारपणात खंबीरपणे उभी असल्याची साक्ष दिली. 
 पहिल्या टप्प्यात शासकीय निकषांनुसार सर्व आवश्यक परवानगी घेतली गेली. यासाठी हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ, तसेच डॉ दिलीप माने, उपसंचालक व डॉ सतीश सूर्यवंशी सहायक संचालक (कोल्हापूर परिमंडळ - आरोग्य सेवा) अवयव प्रत्यारोपण समन्वयक व ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे अमूल्य योगदान लाभले. २६ जानेवारी रोजी ३ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. राहुल पाटील, डॉ हनमशेट्टी, डॉ. दादा कोळी, डॉ. रोहित पाटील, डॉ. प्रवीण घुले, डॉ. टीना गांधी, डॉ शुभांगी पवार, डॉ अमोल धर्माधिकारी, व डॉ. बसवराज कडलगे या अनुभवी तज्ज्ञांच्या टीमचे योगदान महत्त्वाचे ठरले.
 नुसते अवयव प्रत्यारोपण महत्वाचे नसून त्यानंतर लगेचच लागणारी उत्कृष्ट क्रिटिकल केयर व इन्फेक्शन कंट्रोलच्या सखोल निकषांचे पालन केल्याने रुग्ण अगदी सात दिवसांच्या आत पूर्ववत जीवनाकडे वाटचाल करत आहे. रुग्णाचे क्रियाटीनिन जे आधी ९ ते १३ दरम्यान राहत होते, ते आज नॉर्मल (१.१) आहे. 
विशेष म्हणजे पहिलेच प्रत्यारोपण असूनही संपूर्ण प्रक्रिया ही अथायू हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या कोल्हापूर मधील तज्ज्ञांनीच पार पडली.