+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 24 person by visibility 8922 categoryजिल्हा परिषद
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा परिैषदकडे शिफारस केलेल्या ५९९ उमेदवारांच्या यादीत दोन वर्षापूर्वी घडलेल्या टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील अकरा जणांचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. विभागीय आयुक्त पुणे यांच्या संकेतस्थळावर टीईडी गैरव्यवहारमध्ये समाविष्ठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. जिल्हा परिषदेच्या तपासणी दरम्यान यादीतील नावासंबंधी खातरजमा केल्यानंतर टीईटी गैरव्यवहारातील अकरा जणांची नावे पुढे आली. यासंबंधी कार्यवाहीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे. अकरा जण हे परजिल्ह्यातील आहेत.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाते. पवित्र पोर्टल अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे ५९९ शिक्षकांच्या भरती संबंधी शिफारसी केल्या होत्या. यामध्ये मराठी माध्यमातील ५७९, ऊर्दू माध्यमातील १६ शिक्ष्क तर अन्य चौदा जणांच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने पाच ते आठ मार्च २०२४ या कालावधीत विशेष मोहिम राबवली. यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेतली. तपासणीसाठी सहा टीम केल्या होत्या. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी कागदपत्रांची तपासणी अतिशय बारकाईने कराव्यात अशा सूचना तपासणी टीमला केल्या होत्या.
दरम्यान दोन वर्षापूर्वी घडलेल्या टीईटी गैरव्यवहारातील उमेदवारांची यादी आयुक्त कार्याालयच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने ५९९ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना टीईटी घोटाळयाशी कोणी निगडीत आहे का हे सुद्धा तपासले. त्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती निवडीसाठी शिफारस झालेल्या आणि कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांपैकी ११ जण हे टीईटी गैरव्यवहार प्रकरणात समाविष्ठ असल्याचे उघड झाले. यामुळे या शिक्षकांच्या नियुक्तीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणी मोहिमेत नावात बदल किंवा चुका असलेल्या उमेदवारांची संख्या १९५ इतकी आहे. अपूर्ण कागदपत्रे सादर केलेल्या उमेदवारांची संख्या ४२ इतकी आहे. खेळ आरक्षण अंतर्गत विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी दाखल सादर न केलेले सहा उमेदवार आहेत.प्रकल्पगस्त आरक्षण कोटातंर्गत जिल्हा पुनवर्सन अधिकाऱ्यांचा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नसलेला एक उमेदवार आहे. अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र नसलेले सहा उमेदवार आहेत.संगणक अर्हता प्रमाणपत्र नसलेले २५ उमेदवार आहेत.
……………………………
“पवित्र पोर्टलद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने चार दिवस तपासणी मोहिम राबवली. त्या तपासणीत अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही होईल.”
-मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग कोल्हापूर जिल्हा परिषद