+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule08 Mar 24 person by visibility 125 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिलांमध्ये नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे अवघड नाही. स्वतःचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःसाठी महिलांनी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले
 डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सपूजा ऋतुराज पाटील होत्या. यावेळी सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांची प्रमुख उपस्थिती होती. रोपटयाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी "इन्स्पायर इन्क्लुजन" नावाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थीनींसाठी रांगोळी, मेहेंदी, पोस्टर प्रेझेंटेशन तसेच महिला शिक्षक कर्मचाऱ्यांकरिता सॅलेड डेकोरेशन व पौष्टिक पाककृती स्पर्धा तसेच महिला सफाई कर्मचारी यांच्याकरिता उखाणा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सौ. मधुगंधा मिठारी व  गौरी मेहेतर यांनी  सूत्रसंचालन केले.  मुख्यसमन्वयिका शताक्षी कोकाटे व नीला जिरगे यांनी  संयोजन केले. प्रा.  नीला जिरगे यांनी आभार मानले.