+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Mar 24 person by visibility 518 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मराठा समाजातर्फे सरकारचे अभिनंदन करण्यात आले. यासंबंधीचे निवेदन मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी अमोल यांना देण्यात आले
 मराठा समाजाकडून प्रदीर्घ कालावधीचा संघर्ष, आंदोलने, मोर्चे व उपोषण करुन मराठा आरक्षण मिळण्याची मागणी होत होती. या आरक्षणाची मागणी विधीमंडळामध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आली. याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विरोधी पक्ष नेता विधानसभा विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेता विधान परिषद अंबादास दानवे व विधीमंडळ सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला असे नमूद आहे. 
सरकारकडे या निवेदनातून काही मागण्या करण्यात आल्या. यामध्ये सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करुन येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा. नोकर भरतीमध्ये मराठा समाजास दिलेल्या आरक्षणाचा त्वरित लाभ देण्यात यावा. त्यासाठी आवश्यक प्रक्रीया सुरु करावी. मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी लागणार अर्थसहाय्य करुन मराठा शेतकरी वर्गाला लाभ मिळवून द्यावा. कुणबी नोंदीचे प्रलंबीत राहीलेले दाखले त्वरीत देणेत यावे. मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी शासनाने कायदेशीर बाबींची पुर्तता करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 
 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संजयसिंह साळोखे, सुजित चव्हाण, किशोर घाटगे, प्रसन्न शिंदे-शिराळकर, विक्रमसिंह जरग, जितेंद्र पाटील,विकास सुर्वे, गितांजली पाटील, संभाजीराव खेबूडकर, पद्मा पाटील, संगीता खाडे, सम्राट बदाले, राजू तोरस्कर उपस्थित होते.