+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 24 person by visibility 245 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूरतर्फे  रविवारी ( २१ जानेवारी २०२४)  जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची १२ वी परिषद होत आहे अशी माहिती अध्यक्ष डॉ.राजेश सातपुते, जी पी काँन अध्यक्ष डॉ.राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल पॅव्हेलियन येथे रोजी दुपारी चार ते दहा या वेळेत ही परिषद  होणार आहे. या परिषदेत डॉ.दिलीप शिंदे आणि डॉ.पी.पी. शहा यांना जी पी ए *जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
या परिषदेचा कोल्हापूर परिसरातील तसेच कर्नाटकातूनही वैद्यकीय व्यावसायिक लाभ घेणार आहेत. साधारणपणे ५०० वैद्यकीय व्यावसायिक या परिषदेला उपस्थित असणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, तसेच राजश्री छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व विन्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. संतोष प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या परिषदेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्सना वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होते अशावेळी विविध विषयाशी निगडित आपत्कालीन स्थिती कशी सांभाळायची याचे आधुनिक ज्ञान हे व्याख्यात्यांच्या मार्फत दिले जाणार आहे. 
डॉ. सुजाता प्रभू या मेंदुतील इजा व फॅक्चर्स याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान याची ओळख करून देणार आहेत. जनरल प्रॅक्टिशनरच्या दृष्टिकोनातून सामान्य हृदयविकाराच्या इमर्जन्सी कशा हाताळायच्या याबद्दल हृदयरोगतज्ञ डॉ. आलोक शिंदे याबद्दल मार्गदर्शन करतील. डॉ मंजुळा पिशवीकर या स्त्री व प्रसुती शास्त्रातील इमर्जन्सी याबद्दलच्या माहिती देणार आहेत. त्वचा विकारासंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान डॉ. निहारिका प्रभू नायक तर डॉ. देयोना प्रभू या प्लास्टिक सर्जरी तंत्रज्ञानाबद्दल तर डॉ. आकाश प्रभू हे पॉलीट्रामा मॅनेजमेंट याबद्दल माहिती सांगणार आहेत तर न्यूरो सर्जरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान याबद्दल डॉ. संतोष प्रभू मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला  डॉ.दिपक पोवार,डॉ. हरिश नांगरे, डॉ.वर्षा पाटील जाधव,डॉ. महादेव जोगदंडे आदी उपस्थित होते