+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Dec 22 person by visibility 701 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना , रायगड जिल्हा अधिवेशन 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी ::राज्यातील शिक्षक, विद्यार्थी व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी केले.
 पनवेल येथे  महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या रायगड जिल्हा अधिवेशन झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते.
   अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रसाद पाटील म्हणाले, "शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे अल्पावधीत संघटना राज्यातील सर्व शिक्षकांच्या मनामनात पोहोचली आहे. शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात जास्त न्यायालयीन लढा व आंदोलने पुरोगामी शिक्षक संघटनेने करून राज्यातील शिक्षकांना वेळोवेळी न्याय मिळवून दिला आहे."
   दरम्यान जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक दयानंद मोकल यांचाही सत्कार करण्यात आला.
  याप्रसंगी राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, राज्य महिला सरचिटणीस शारदा वाडकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, ज्ञानेश्वर मोरे यांची भाषणे झाली.
  संघटनेचे जिल्हा प्रमुख सल्लागार अविनाश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. सारिका म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष वसंत मोकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास  पंचायत समिती सदस्या मनिषा मोरे, महिला राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने, राज्य संघटक पी. आर. पाटील, कोल्हापूर जिल्हा नेते गोविंद पाटील, करवीर सरचिटणीस शशिकांत पवार, रमेश मोकल आदी उपस्थितीत होते.
......................
रायगड जिल्हा नुतन पदाधिकारी : प्रमुख सल्लागार-अविनाश म्हात्रे, जिल्हाध्यक्ष- वसंत मोकल, जिल्हा कार्याध्यक्ष- विश्वास ठाकूर, जिल्हा कोषाध्यक्ष -* सुनील देशमुख, उपाध्यक्ष- पी. एस. म्हात्रे, जिल्हा सहसचिव -विकास गायकवाड.