+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Apr 24 person by visibility 42 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
राधानगरी तालुक्यातील तिटवे  येथील शहीद पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. तसेच् अंगणवाडीतून पहिलीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी  आयाजित  समारंभ हा एक अनोखा उपक्रम होता. दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलनात एकूण बावीसहून अधिक परफॉर्मन्स सादर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मबाई सीताराम पाटील व शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर विशेष उपस्थित होते. 
 कोल्हापूर पाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता  स्मिता माने व दुधसाखर ज्युनिअर कॉलेज बिद्रीचे प्रा. विनय कुलकर्णी  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना जीवनात श्री रामांनी शबरी ला सांगितलेली सहा तत्वे पाळली तर आपण एक चांगली व्यक्ती बनू शकतो असं ते म्हणाले.  माने यांनी पाण्याचे महत्व या विषयी बोलल्या. तसेच डॉ. जगन्नाथ पाटील यांनी चांगल्या संकल्पनेतून या शिक्षण संस्थेची स्थापना केली व ग्रामीण भागातील विदर्थ्यांना खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे, याबद्दल कौतुक केले.
शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्कूलचे व्यवस्थापक संतोष चौगले यांनी अहवाल वाचन केले. दरम्यान स्नेहसंमेलनामध्ये मराठमोळी, पंजाबी, कोळी, तमिळ, धनगर अशा अनेक गाण्यांवर विद्यार्थी थिरकले. तसेच वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा बेस्ट स्टूडेंट ऑफ द इयर आणि बेस्ट टीचर ऑफ द इयर हे दोन पुरस्कार अनुक्रमे विद्यार्थिनी कु. प्रगती रमेश पाटील व शहीद पब्लिक स्कूलच्या सहशिक्षिका विद्या पुंडलिक पाटील यांना मिळाला. 
 सुरेखा पाटील व शिल्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  कृष्णात कांबळे यांनी आभार मानले. संस्थेचे खाजनिस अनिल पाटील, सचिव दिलीप देसाई, शहीद महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाचे विभागप्रमुख दिग्विजय कुंभार , संगणक विभागाचे विभागप्रमुख सागर शेडगे, तसेच विनायक पाटील, वैभव कुंभार, स्कूलच्या प्रभारी प्राचार्या ऐश्वर्या शिवाजी कवडे, उप प्राचार्य अनिल भांडवले, कल्चरल विभागाच्या विभागप्रमुख कोमल चव्हाण उपस्थित होते.