+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Mar 24 person by visibility 124 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२३ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी पात्र ठरतील.
     नव्या पिढीतील ख्यातनाम कवी आणि कादंबरीकार डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या आकस्मिक निधनानंतर २०१२ पासून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे त्यांच्या रत्नाकर काव्य पुरस्कार देण्यात येतो. या अगोदर हे पुरस्कार सुरेश सावंत, अजय कांडर, श्रीकांत देशमुख, श्रीधर नांदेडकर, कल्पना दुधाळ, सारिका उबाळे,पी. विठ्ठल,अरुण इंगवले,संजीवनी तडेगावकर,सुचिता खल्लाळ,पद्मरेखा धनकर,दीपक बोरगावे,कविता मुरूमकर,हबीब भंडारे,गोविंद काजरेकर,राजेंद्र दास,केशव सखाराम देशमुख,कीर्ती पाटसकर यांना मिळाले आहेत.
दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यासाठी ०१जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवाव्यात – कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ए वॉर्ड, ६ स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल रस्ता, सरस्वती टॉकीज जवळ, कोल्हापूर - ४१६०१२