+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Mar 24 person by visibility 143 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार  २०२३-२४ या वर्षासाठी देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील वीरशैंव- लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी सन २०२३-२४ या वर्षासाठी रितसर अर्ज १५ मार्च २०२४ रोजी सांयकाळी ५.३० पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विचारेमाळ, कोल्हापूर कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक सचिन साळे यांनी केले आहे.
 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/ दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समान संघटनात्मक कार्यकर्ते अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
 समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी आवश्यक पात्रता - या योजनेनुसार वीरशैव लिंगायत समाजाकरिता समाजकल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक, अध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणारे नामवंत, समाजसेवक, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक असावेत. वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले असावे. पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय पुरुषांचे वय ५० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे व स्त्रियांचे वय ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे. अपवादात्मक प्रकरणी वरील वय शिथिल करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडे राहतील. कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तिगत, मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल, समाजातील त्यांच्या पदाचा विचार करण्यात येणार नाही. पुरस्कारासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सभासद किंवा कोणता लोकप्रतिनिधी पात्र असणार नाही . वरील क्षेत्रात कमीत कमी १० वर्षे वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणा-या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.
सामाजिक संस्थांसाठी पात्रता : समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मलुन करणे, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इ. क्षेत्रात कार्य करणा-या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १९६० खाली संस्था नोंदणीकृत असावी. स्वयंसेवी संस्थेचे वरील क्रमांक १ मध्ये दर्शविलेले समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणा-या संस्थांच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्याचे अधिकार शासन नियुक्त समितीस राहतील. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातीत व राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावे. वीरशैव लिंगायत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थाना दिला जाईल.
****