महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
“ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे शिक्षकांची समर्पण आणि योगदान हे अतुलनीय आहे. एक चांगला माणूस घडवण्यासाठी शिक्षक अखंड कष्ट घेतो विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वप्न जागृत करण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा शिक्षक देत असतात. लोकनेते माजी खासदार सदाशिव मंडलिक आणि त्यांच्या पत्नी विजयमाला मंडलिक हे दोघेही शिक्षक होते त्यांनी आपल्या आयुष्यात गोरगरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका ठेवली होती त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात वाचन संस्कृती शिक्षक संस्कृती रुजली.’ असे मत साहित्यिक माजी प्राचार्य जीवन साळोखे यांनी मांडले
येथील जरगनगर न्यू इंग्लिश स्कूल शैक्षणिक संकुलात कै. शंकरराव दौलतराव पाटील (कोलोलीकर) सोशल फाउंडेशन आयोजित आदर्श शिक्षक आणि प्रशिक्षक गौरव समारंभ झाला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. डी यु पवार होते.
पवार म्हणाले, ‘आज समाजात कृतज्ञता व्यक्त करण्यास सवड नाही समाजात ज्ञानदानासोबतच लोकसेवा करणारी समाजसेवक अखंड काम प्रसिद्ध असून दूर राहून करतात असे सांगितले.
विवेकानंद कॉलेजचे प्रा. अशोक पाटील म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते मानवी जीवनात अनन्य साधारण असते विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्याची प्रेरणा शिक्षक देतात समाजाला सर्जनशील करण्याचे काम स्वर्ग. शंकराव पाटील कोडोलीकर यांनी केले म्हणूनच कासारी नदीच्या काठावर शैक्षणिक क्रांती घडून आली आहे.”
फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. कर्नल शरदचंद्र पाटील, प्रा. डॉ. सचिन श्रीरंग चव्हाण, प्रा. सुषमा पाटील, प्रा. संजय गायकवाड, ज्योतिबा जाधव, स्वाती ढोबळे, गणेश चव्हाण, नाना सावंत, संतोष पवार, कृष्णात पाटील यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शेखर मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. सीमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले