+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 24 person by visibility 304 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध प्रकारच्या कंदुमुळांची ओळख व्हावी, आहारातील वापर वाढावा असा व्यापक उद्देश ठेवून कोल्हापुरात २० व २१ जानेवारी २०२४ या कालावधीत ७० पेक्षा अधिक प्रकारची कुंदमुळे व १६० पेक्षा अधिक औषधी वनस्पतींचा उत्सव आयोजित केला आहे अशी माहिती संयोजक मिलिंद धोंड व निसर्ग अंकुर संस्थेचे प्राचार्य मधुकर बाचूळकर यांनी दिली.
हे दोन दिवसीय प्रदर्शन दसरा चौक येथील छत्रपती शहाजी कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते वीस जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्प्शॅन २४ या संस्थेने आयोजन केले आहे. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, यूथ अॅनेक्स, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनिअल्स, रोटरॅक्ट कोल्हापूर झोन यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन होत आहे.
या प्रदर्शनात ठेवणाऱ्या कंदाचे संकलन पामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बेल्हे आणि कोल्हापुरातील गगनबावडा या भागातून केले आहे. कंदमुळे व औषधी वनस्पतींची माहिती देण्यात येणार आहे. सात प्रकारच्या कंदाच्या पाककृती असेल. तसेच हौशी खवय्यांना कंदापासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. ‘लेटस गेट बॅक टू अवर रुटस’या ब्रीदवाक्याचा अंगिकार करुन हे प्रदर्शन भरविले आहे. चॅनेल बी या प्रदर्शनाचे मिडिया पार्टनर आहेत.
पत्रकार परिषदेला प्राचार्य अशोक वाली, प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, मंजिरी कपडेकर, सुशिल रायगांधी, अभिजीत पाटील, आरती रायगांधी, राजू तेली आदी उपस्थित होते. प्रदर्शन वीस तारखेला सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत व २१ जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत खुले राहील.