+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Apr 24 person by visibility 115 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कोल्हापूर शहरातील १०५ माजी नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला. यामध्ये बारा माजी महापौरांचा समावेश आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, विद्यमान खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची सोमवारी (१५ एप्रिल) बैठक झाली. माजी नगरसेवक प्रा.जयंत पाटील, सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन केले होते.
 "१९९५ ते २०२० या कालावधीत विविध पक्षाकडून निवडून झालेल्या माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील १०५ माजी नगरसेवकांच्या पाठिंबामुळे महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना मोठे बळ मिळाले आहे. मंडलिक यांचा विजय निश्चित आहे." असे खासदार महाडिक यांनी सांगितले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरून निधी मिळाला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी एक हजार कोटीचा निधी देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. त्या माध्यमातून शहरात विविध प्रकल्पांना गती येईल". उमेदवार मंडलिक म्हणाले, "नगरसेवकांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे होत असतात. महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन शहराचा आणखी विकास करू."यावेळी प्रा. जयंत पाटील यांचे भाषण झाले. सत्यजित कदम यांनी प्रास्ताविक केले. 
माजी महापौर राजू शिंगाडे, बाजीराव चव्हाण, उदय साळोखे, दीपक जाधव, सरिता मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती महेश सावंत, दत्तात्रय इंगवले,  परीक्षित पन्हाळकर, सतीश‌ घोरपडे, विलास  वास्कर, संजय निकम, मुरलीधर जाधव, आदिल फरास, आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, महेश वासुदेव, चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, विजय खाडे, सुभाष रामुगडे, रमेश पुरेकर, प्रदीप उलपे, राहुल चव्हाण, रशीद बारगीर, रूपाराणी निकम, माधुरी नकाते, अर्चना पागर, भाग्यश्री शेटके, मनीषा कुंभार, कविता माने, किरण नकाते, उत्तम कोराणे, वैभव माने, सुनील मोहिते, संजय सावंत आदी उपस्थित होते.