+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 565 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला विविध रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.  त्या निधीतून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी ते राष्ट्रीय महामार्ग चार या रस्त्यासाठी ३० लाख रुपये, सरनोबतवाडी कृषी कॉलनी ते विमानतळ मार्ग ते रामा क्र १९४ ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी वीस लाख रुपये, उचगाव ते राजपल्लू मंगल कार्यालय रस्ता आणि प्रजीमा क्र.३७ पासून नंदगाव पैकी हंचनाळवाडी पर्यंत रस्ता तसेच वसगडे सोनार मळा ते नंदीवाले आनंद रस्त्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रजिमा २० ते जुने चिंचवाड ते नदी पाणवठा रस्त्यासाठी २५ लाख तर शिरोली जिल्हा परिषद मतदार संघातील प्ररामा क्र ६ पासून मौजे वडगाव नागाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या रस्त्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 
 राज्य सरकारच्या  ग्रामविकास विभागाकडे माजी आमदार महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला असून लवकरच या निधीतून प्रस्तावित विकास कामे सुरू होतील. केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार न करता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी खेचून आणणाऱ्या माजी आमदार  महाडिक यांच्या कामाचे कौतुक होत आहे.