+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Mar 24 person by visibility 180 categoryसामाजिक
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजममध्ये महिला दिन उत्साहात 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
 "आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे." असे मत  डी वाय पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले.
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून पाटील बोलत होत्या. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजित रक्तदान आणि हिमोग्लोबल तपासणी शिबिराचे उद्घाटन पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर महिला प्राध्यापकांच्या मुलाखती असलेल्या विशेष न्यूज लेटरचे प्रकाशन पूजा पाटील, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिम्पा शर्मा, सीएचआरओ सौ. श्रीलेखा साटम यांच्या करण्यात आले.
 यावेळी बोलताना पूजा पाटील म्हणाल्या, आपण लोकांना प्रेम दिले तर विविध मार्गाने आपल्यालाही प्रेमचा मिळते यावर आपला विश्वास आहे. प्रत्येक व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन त्याच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे. कोणत्या  गोष्टीचा दबाव न घेता स्वतःला प्रोत्साहन दिले तर आणखी वेगाने प्रगती होईल.
   एक पत्नी, आई, सून आणि डी. वाय. पाटील ग्रुप मधील जबाबदाऱ्या असे मल्टी टास्किंग काम करत असताना आपल्या कुटुंबाची विशेषत: पती आमदार ऋतुराज पाटील यांची भक्कम साथ मिळत आहे. ते देत असलेल्या प्रोत्साहनमुळेचे चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिम्पा शर्मा म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवून कोणतेही काम करावे. आपले काम करत असताना सर्वोच्च देण्याचा प्रयत्न करावा. अपयश हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही. त्यामुळे महिलांनी विशेषत: विद्यार्थीनिनी नैराश्यात जाऊ नये. त्यासाठी सोशल नेटवर्क बनवा, सतत मित्र-मैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी कनेक्ट रहा.
डी वाय पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम म्हणाल्या, वर्षातला प्रत्येक दिवस हा महिला दिन आहे. घर आणि काम यामध्ये समतोल राखण्यासाठी योग्य नियोजन हवे.   विद्यार्थिनींनी प्रेझेंटेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करत असताना स्वतःसाठी वेळ द्या. असे आवाहन त्यांनी केले.
 डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्याची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ५१ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आसावरी यादव, डॉ. स्नेहल शिंदे, प्रा. श्रुती काशीद यांनी केले. डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या अधिकाऱ्याचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.