+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 151 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : चाळीस वर्षापासून ग्रामपंचायतच्या प्रतिक्षेत असलेल्या सोनार्ली  गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरण प्रकल्पातील विस्थापित झालेले सोनार्ली धरणग्रस्त हे गाव १९८५ मध्ये पेठ वडगाव शेजारी वसवण्यात आले आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे
सोनार्ली हे गाव विस्थापित होऊन चार दशकं झाली. या विस्थापित गावाला आजही सर्व प्रकारच्या प्रशासकीय मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागत होते कारण या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय नव्हते. 
   या गावातील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मूलभूत हक्कासाठी सरकार दरबारी त्यांनी आपला लढा सुरु केला. गावच्या सेवा सुविधा व ग्रामपंचायत कार्यालयासाठी शासन दरबारी मोर्चे, अंदोलनाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत होते. 
ग्रामस्थांच्या या लढ्याला माजी आमदार महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनीही पाठबळ दिले. २०२१-२२ मध्ये सोनार्ली गावची स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरी बाबतचा प्रस्ताव सरकार दरबारी दाखल झाला. श विविध विभागातून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत माजी आमदार महाडिक यांनी हा लढा यशस्वी केला.
 राज्य सरकारच्या सात  मार्चच्या राजपत्रात सोनार्ली ग्रामपंचायत मंजुरीची अंतिम अधिसूचना प्रसारित झाली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयाचा हा लढा यशस्वी करण्यासाठी माजी आमदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विलास सोनावणे, कौशिक आनंद,संतोष गोटल, बाळू पाटील,अकबर पन्हाळकर (सर),पांडुरंग लाखन,काशिनाथ घोलप,सुलेमान पन्हाळकर, पिरमहमद पन्हाळकर,किरण कांबळे,अंकुश घोलप,पांडुरंग कोठारी, ॲड. दिनेश घोलप,चंद्रकांत य. घोलप, उस्मान पन्हाळकर, काळू सकपाळ यांचे सहकार्य लाभले.