+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Apr 24 person by visibility 248 categoryसामाजिक
सातासमुद्रापलीकडे असणार्‍या मराठी लोकांना एकत्र आणणे, पुढच्या पिढीला मराठी वारसा देणे आणि मराठी संस्कृतीचे जतन करणे, ह्या उद्देशाने, सुमारे दशकभरापूर्वी काही मराठी कुटुंबियांनी एकत्र येऊन स्वीडनमधल्या गोथेनबर्ग शहरात, गोथेनबर्ग महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे "जीबीजीएमएम"संचलित गुढीपाडवा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 रविवारी (१५ एप्रिल)  हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या अतिशय  लेझीम खेळाने झाली. लेझीम हा प्रकार स्वीडनमध्ये सर्वप्रथम सादर करण्याचा मान ह्या मंडळाने मिळवला आहे. 
गुढीपाडवा आणि अयोध्येतील राम मंदिराची स्थापना हा दुग्धशर्करा योग साधून यंदा गीतरामायणावर आधारित  प्रयोग सादर करण्यात आला.  छोट्या कलाकाराने महाराष्ट्रातील अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर केला. मराठी सिनेसृष्टीचा जुन्या काळापासून ते आतापर्यंतचा प्रवास  विविध नृत्य, गायन सादर केले.  मराठमोळ्या कार्यक्रमाची सांगता गोथेनबर्ग मधील सुगरणींनी केलेल्या मराठमोळ्या पदार्थांच्या आस्वादाने झाली.  गुणदर्शनांच्या कार्यक्रमाने मराठी लोकांनी हिंदू नववर्षाचे वाजत गाजत स्वागत केले.