+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Mar 24 person by visibility 132 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘गुरु शिष्य’ उपक्रमांतर्गत कलाप्रदर्शनाचा प्रारंभ १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे होणार आहे. या सोहळ्यात के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार शिल्पकार ओंकार कोळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
ओंकार कोळेकर यांनी शिल्पकार म्हणून अनेक लक्षणीय शिल्पे घडवली आहेत. पंजाब येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अहमदनगर येथे राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, खेतवाडी मुंबई येथे राजर्षी शाहू स्मृती स्मारक, कोल्हापूरातील राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे शाहू कार्यावरील शिल्प, अंबारीसह भव्य हत्ती, कोकरुड येथील शिवाजीराव देशमुख यांचा पुतळा, कोल्हापूर येथील अहिल्यादेवींच्या पुतळा यासह अनेक पुतळे साकारले आहेत. त्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. कलाप्रदर्शनामध्ये विजय टिपुगडे, विलास बकरे, शिवाजी मस्के, मनोज दरेकर,संतोष पोवार, नागेश हंकारे, बबन माने, अभिजीत कांबळे, प्रविण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, शैलेश राऊत, किशोर राठोड,राहूल रेपे, विजय उपाध्ये, अरिफ तांबोळी, प्रकाश मोहिते, नवज्योत काळे, सर्वेश देवरूखकर, पुष्कराज मेस्त्री, शुभम कुंभार, ओंकार कोळेकर, इंद्रजित बंदसोडे, पुनम राऊत, सुदर्शन वंडकर यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन दि. १५ ते २१ मार्च या कालावधीत सर्वासाठी खुले राहणार आहे.