महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, रिलायंस इंडस्ट्रीज, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, वॉटर फिल्ड रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी येथे २० एप्रिल २०२३ रोजी ‘पाऊस पाणी संकलन : भू-जल व्यवस्थापन मोफत जनजागृती कार्यशाळा’ आयोजित केली आहे. सकाळी १० ते दुपारी १.३० पर्येंत होणाऱ्या कार्यशाळेत विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने प्रसिद्ध जलतज्ञ संदीप अध्यापक (वॉटर फिल्ड रिसर्च फौंडेशन) हे भूजल व्यवस्थापनाचे यशस्वी प्रयोग व लाईव्ह डेमो, बोअर, विहीर यांचे बंद पडलेले पाण्याचे स्त्रोत पूर्ववत करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणार आहेत. बंगलो, घरे, उद्योग, अपार्टमेंटस, शाळा, कॉलेजस, हॉस्पिटल व हॉस्टेल यांना ‘रेन हार्वेस्टिंग’ उपक्रम राबवण्यासाठी उपयुक्त माहिती या कार्यशाळेत देणार आहोत. तसेच शेतकरी, शेती संबंधी व्यावसायिक, इंजिनिअर, शेती अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी सदर कार्यशाळेत विविध प्रयोग पाहता येणार आहेत. तसेच कार्यशाळेत निवडक बोअर्सना पुन:भरण करून देण्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी करिता ९३७०७१३७३१/ ८१६९५८४००४ या क्रमांकावर संपर्क साधावा.