घटत्या जन्मदराच्या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ –वैद्यकीयतज्ज्ञांचा अभ्यास गट-कुलगुरू डी. टी. शिर्के
schedule13 Jul 25 person by visibility 29 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ घटत्या जन्मदरासंदर्भात शिवाजी विद्यापीठ व वैद्यकीय तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून संशोधन करता येईल, त्यासाठी विद्यापीठाकडून मदतीचा हात पुढे करीत आहे तर डॉक्टरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. ’ अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली.
इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन राज्य शाखा आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी यांच्या सहभागाने हॉटेल सयाजी येथे १२ व १३ जुलै २०२५ रोजी वंध्यत्वविषयक दोनदिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण कुर्तकोटी म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र चाप्टर ऑफ ईसारच्या अध्यक्षा डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी आपल्या कार्यकालामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, सर्व परिषदा तसेच नवीन गर्भ तज्ज्ञ निर्माण करण्याचा अभ्यासक्रम व आयव्हीएफ क्लिनिकमधील नर्सेसना स्पेशल ट्रेनिंगची व्यवस्था केली होती. ’
दरम्यान डॉ. जिरगे यांनी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी डॉ. अमित पत्की यांना पदभार दिला आहे. पुढील कालावधीसाठी डॉ. जिरगे यांनी चालू केलेले गर्भ निर्माण तज्ज्ञ व नर्सेस यांचा ट्रेनिंग प्रोग्राम असाच पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन डॉ. पत्की यांनी यावेळी दिले. चर्चासत्रात टेस्टट्यूब बेबीसारख्या आधुनिक आणि उपचार पद्धती, त्यातील नवीन संशोधन याचे सादरीकरण झाले. यामध्ये डॉ. जयदीप टंक, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमित पत्की, डॉ. केदार गणला, डॉ. तानाजी पाटील, डॉ. रणजित किल्लेदार, डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पत्की, डॉ. मिलिंद पिशवीकर आणि डॉ. प्रवीण हेन्द्रे परिषदेमध्ये सहभागी झाले.