प्रविण गायकवाडांवरील हल्ल्याच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने
schedule14 Jul 25 person by visibility 103 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे एकत्र येऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.‘ शिवभक्त प्रविण गायकवाड…महाराष्ट्र तुमच्यासोबत’असे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त होता. गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, उमेश पोवार, बाळासाहेब पाटील, रुपेश पाटील, जीवन बोडके, उमेश सुर्यवंशी, हिदायत मणेर, राजू मालेकर, विकास जाधव, भगवान कोईंगडे, अभिजीत कांजर, शाहीर दिलीप सावंत, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, शैलजा भोसले यांनी निदर्शने केले. गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.