Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नगररचना कार्यालयात  जनसुनावणी ! ढिम्म अधिकारी, आंदोलकांकडून दगड पूजण्याचा प्रकार!!स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आप उतरणारअनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, आम्ही विकासकामे करुन दाखविली-खासदार धनंजय महाडिकप्रविण गायकवाडांवरील हल्ल्याच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेराहुल काणेचा विजेतेपदाचा डबल धमाका ! श्रावणी तोडकर, अवनीश नेवरेकर, चिन्मय धवलशंख विजेते !!राज्यात २००० नवीन ग्रंथालये, करवीर नगरला पाच लाखाचा विशेष निधी- मंत्री चंद्रकांत पाटीलउज्ज्वल निकमांच्या खासदारपदी निवडीनंतर कोल्हापुरात आनंदोत्सव ! देसाई, राणे परिवाराशी कौटुंबींक स्नेह !!घटत्या जन्मदराच्या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ –वैद्यकीयतज्ज्ञांचा अभ्यास गट-कुलगुरू डी. टी. शिर्केशक्तीपीठ महामार्गावरुन नेत्यांच्यामध्ये वाकयुद्ध ! राजू शेट्टी, सतेज पाटलांचा सवाल, राजेश क्षीरसागरांचे आव्हान !!घुंगुरमाळा कवितासंग्रहाला कोल्हापूरच्या मातीचा गंध, संस्कृतीचा बाज

जाहिरात

 

राहुल काणेचा विजेतेपदाचा डबल धमाका ! श्रावणी तोडकर, अवनीश नेवरेकर, चिन्मय धवलशंख विजेते !!

schedule14 Jul 25 person by visibility 34 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत खुल्या पुरुष एकेरीसह मिश्र दुहेरीत राहुल काणेने विजेतेपद पटकाविले. महिला गटात श्रावणी तोडकर, मुलांमध्ये अवनीश नेवरेकर, चिन्मय धवलशंख हे विजेते ठरले आहेत.अंबाई डिफेन्स हॉल येथे ही स्पर्धा झाली.यामध्ये ३२६ हून खेळाडूंनी सहभाग घेतला.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा झाल्या.  स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाला.शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक शरद बनसोडे, सुहासिनीदेवी घाटगे, उद्योजक सचिन शिरगावकर, अरविंद रुईया, ऋतुराज इंगळे, सीमा शहा, सुरेखा सापडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे, उपाध्यक्ष विनोद भोसले, खजिनदार चंद्रशेखर सोवनी, सचिव तन्मय करमरकर तसेच सुमित चौगुले, साईदास, जगदीश काणे, अरुणा रसाळ, योगिनी कुलकर्णी, सिद्धार्थ नागावकर आणि अक्षय मनवाडकर हे पदाधिकारी उपस्थित होते

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे अकरा वर्षाखालील मुले -  अवनीश नेवरेकर विजयविरुद्ध ऋषभ रोकडे  21 -9, 21 -8. पुरुष एकरी अंतिम सामना - राहुल काने विजय विरुद्ध रितेश सांदुगडे 21 -19, 21-6, महिला एकरी अंतिम सामना - श्रावणी तोडकर विजयी.17 वर्षाखालील मुले डबल्स अंतिम सामना - आयुष पाटील, चैतन्य तारे विजय विरुद्ध समी भट्टेजा शिवराम मोरे  21- 18, 21- 14. मिश्र दुहेरी अंतिम सामना - राहुल काने अंकिता मुरगुडे विजय विरुद्ध रितेश सांदुगडे, खुशी पाटील 21 -16, 21- 14.  पुरुष दुहेरी 35 वर्षावरील -  जयराज साळुंखे, निनाद कामत विजय विरोध अतुल शिरोडकर जय चंदवानी  21- 16, 21 -8. 19 वर्षाखालील मुले अंतिम सामना  चिन्मय धवल शंख विजय विरुद्ध अभिनव हरणे 21 -18, 21 -14. पंधरा वर्षाखालील मुले दुहेरी - आयुष कदम रुद्र सिद्ध विजय विरुद्ध तन्मय पाटील विष्णुवर्धन इटकर 21- 16, 21 -14, पुरुष दुहेरी अंतिम सामना -निनाद कामत, रितेश सांदुगडे विजय विरुद्ध राहुल काने, आदित्य कांबळे  21- 15  21 -18

[

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes