अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, आम्ही विकासकामे करुन दाखविली-खासदार धनंजय महाडिक
schedule14 Jul 25 person by visibility 34 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, मात्र आम्ही विकासकामे करून दाखवली असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
खासदार महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी ८५ लाखांच्या निधीतून हाय मास्ट सोलर दिव्यांची यंत्रणा मंजूर केली आहे. जिल्हा परिषद कॉलनी इथल्या या हाय मास्ट सोलर लाईटच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यासह या परिसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार मानत आहे.’असे आमदार नरके यांनी सांगितले. धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपचा आपल्याला मोठा आशीर्वाद लाभल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अर्चना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दिवसे, बी.के.जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. तत्पूर्वी महाडिक यांनी श्री नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी नागदेववाडीच्या सरपंच अमृता पोवार, समीर पोवार, विनय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पोतदार, सगुणा बाटे, डॉ. के.एन.पाटील, विश्वास निगडे, मोहन कांबळे, जिल्हा परिषद कॉलनीचे अध्यक्ष अनंत खोपडे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रय आवळे, प्रदीप बाटे, किशोर मुसळे उपस्थित होते.