अंबाबाई देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा
schedule30 Sep 25 person by visibility 71 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अष्टमीला करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पारंपरिक पूजा बांधण्यात आली. महिषासुरांशी आठ दिवस युद्ध झाले. आठ दिवसाच्या युद्धानंतर अष्टमीला दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. नवरात्रोत्सवात अष्टमीला देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते. मंगळवारी, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळपासून मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता. यंदा, नवरात्रोत्सवात देवीची महाविद्या रुपात पूजा बांधण्यात येत आहे.