सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ! रस्त्याचे कामाची तपासणी करा !!
schedule01 Oct 25 person by visibility 67 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सरकारमधल्या दोन्ही सत्ताधारी आमदारांना माझे आव्हान आहे शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्याचे काम योग्य दर्जाचे झाले की नाही याची तपासणी करा ? अधिकाऱ्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा देणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचे काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील.’असा खोचक टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगाविला नुसते अधिकाऱ्यांना बोलण्याने आणि हक्क भंग आणतो वगैरे बोलून उपयोग नाही. तर त्यांनी आता लगेच हक्कभंग आणावा. असे आवाहनही त्यांनी क्षीरसागरांना केले.
आमदार सतेज पाटील हे एका बैठकीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राज येऊन या ऑक्टोबरला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, महानगरपालिकेचा सर्व कारभार आलबेल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. प्रशासकांच्या काळात कोणाचा कोणाला पायपोस नाही. फुलेवाडी येथे अग्निशमन विभागाच्या इमारतीच्या कामाचे टेंडर कोणाच्या दबावाखाली देण्यात आले काय ? यांचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे याबाबत महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी या चौकशीमध्ये कोणालाही क्लीनचीट देऊ नये. अशी मागणीही केली.
दंड झालेला कॉन्ट्रॅक्टर खाडे…
आमदार पाटील म्हणाले, ‘शहरातील पाणीपुरवठ्यावर राजकारण करण्याऐवजी आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरातील दोन्ही आमदारांनी प्रशासनाची बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठ्यासंबंधी तोडगा काढायला हवा. थेट पाईप लाईन मधून कोल्हापूर शहरासाठी किती पाणी मिळते याची आकडेवारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र राजकारण न करता थेट पाईपलाईन मधून आलेल्या पाण्याचे वितरण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे होईल, आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी महानगरपालिकेने काढल्या पाहिजे.कोल्हापूर शहरात गेल्या पाच वर्षापासून प्रशासकराज आहे. ज्यांना शहरात टाक्या उभा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी ते काम केलेले नाही. त्या बदल्यात त्यांना 23 कोटीचा दंड लावण्यात आला आहे, असे असताना विनाकारण आरोप करणे चुकीचे आहे. ज्यांना दंड लावले ते कॉन्ट्रॅक्टर खाडे आहेत. त्यांनी हा दंड माफ व्हावा यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मात्र विनाकारण काहीही काढत असाल आणि तुम्ही एक माझ्या विरोधात बोलला तर मी सात तुमच्या विरोधात बोलेन.’
ठड दद
schedule25 Sep 25 person by visibility 100 category
21:02
00
00
463
New Doc 09-25-2025 20.25.pdf
- प्रेसनोट दिनांक २५/०९/२०२५
आरोपी विनायक सुरेश तेजम, बय ३७ वर्षे, साजगी वकील, रा. फ्लॅट नं.ए-९, मंजुळा अपार्टमेंट, के.डी.सी.सी. बैंक समोर शाहुपूरी कोल्हापूर, जि. कोल्हापूर गाने प्रांत कार्यालय करवीर यांचेकडुन त्याचे ओळखीने काम करून घेतले असुन त्याकरीता प्रांत कार्यालयात पैसे दयावे लागतील असे म्हणून लाच मागणी करून स्विकारलेबाबत...
यातील मुळ तक्रारदार मांचे कोल्हापूर येथील मिळकती वरील व सत्ता प्रकार कमी करणेसाठीचे प्रकरण प्रांत कार्यालय करवीर येथे दाखल होते. त्या प्रकरणावर प्रांत कार्यालय करवीर येथुन आदेश काढून देणेसाठी खाजगी वकील विनायक तेजम याने प्रांत कार्यालयात देणेसाठी तकारदार मांचेकडुन तकारीपुर्वी १,६५,०००/-रूपये घेतले होते. त्यानंतर तकारदार यांचे प्रकरणाचा मुळ आदेश काबुन देणेकरीता प्रांत कार्यालयात आणखीन १,००,०००/-रूपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो कोल्हापूर येथे तफार दिलेली होती.
तकारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये मुळ तक्रारदार यांचे कोल्हापूर येथील मिळकती वरील व सत्ता प्रकार कमी करणेसाठीचे प्रकरणावर प्रांत कार्यालय करवीर येथुन आदेश कावुन देणेसाठी खाजगी वकील विनायक तेजम याने प्रांत कार्यालयात देणेसाठी तक्रारदार यांचेकडून यापुर्वी १,६५,०००/- रूपये पेतल्याबाबत दुजोरा देवून तकारदार यांच्याकडे त्यांचे मिळकतीचे प्रकरणाचा आदेश प्रांत कार्यालय करवीर यांचेकडुन प्राप्त करून घेतला आहे म्हणून प्रांताधिकारी करवीर यांचे नाव सांगुन त्यांचेकरीता आणखीन २५,०००/- रूपये दयावे लागतील असे माणून तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रूपये लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले
सापळा कारवाई आयोजीत केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष विनायक तेजम यांनी तक्रारदार यांचेकडुन मागणी कैलेप्रमाणे २५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारलेने त्यांना पकडणेत आले सदरबाबत आरोपी विनायक सुरेश तेजम, वय ३७ वर्षे, खाजगी वकील, रा. पलेंट नं.ए-९, मंजुळा अपार्टमेंट, के.डी.सी.सी. बैंक समोर शाहुपूरी कोल्हापूर, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द शाहुपूरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे. श्री. अर्जुन भोसले, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे यांचे तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार राजेंद्र सानप पोलीस निरीक्षक, पो हे. कॉ. सुधीर पाटील, पो.ना. सचिन पाटील, पो. कॉ. संदिप पवार, पो.कॉ. कृष्णा पाटील, चा.पो कॉ प्रशांत दावणे ता.प्र.वि. कोल्हापूर अॅन्टी करपान ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाचेच्या अथवा अपसंपदेबाबतच्या तकारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील कंमाकावर संपर्क साधावा
१८००२२२०२१ १) मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, म.रा.मुंबई टोल फ्री क्रमांक
२) मा.पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र, पुणे दुरध्वनी कमांक ०२०/२६१२२१३४,
०२०/२६१३२८०२, ०२०/२६०५०४२३. ३) श्रीमती वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर
मो.नं. ९७६४१४०७७७. ९४०४३२१०६४ कार्यालय दुरध्वनी कमांक ०२३१/२५४०९८९.
४) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक: १०६४. ५) व्हॉटस अप क्रमांक ७८७५३३३३३३.
1 of 1
Scanned with OKEN Scanner
जज बब
schedule09 Aug 25 person by visibility 288 category
मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मान्यता
schedule29 May 25 person by visibility 614 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बहुप्रतिक्षित मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या मागणीला यश आले आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे, यासाठी सर्व्हेक्षण करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे लवकरच दुपदरीकरण होईल आणि अनेक नव्या गाडया कोल्हापुरातून सुरू होतील, यासाठी आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार महाडिक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग एकेरी असल्याने गाडयांचे क्रॉसिंग, रेल्वे गाडयांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढवण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याचा परिपाक म्हणून केंद्र सरकारने मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्व्हेक्षण करण्यास मंजूरी दिली आहे. त्यातून एकप्रकारे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होणार, याचे संकेत मिळाले आहेत. वंदे भारतसह नव्या रेल्वे गाडया कोल्हापुरातून सुरू करण्यासाठी दुपदरीकरण होणे अत्यावश्यक आहे. सर्व्हेक्षण झाल्यानंतर लवकरच दुपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
छछ झज
schedule18 Dec 24 person by visibility 1021 category
जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा स्तरीय खातेप्रमुख आणि जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि तालुका स्तरीय खातेप्रमुख यांची समन्वय सभा paar पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित राहून आढवा घेतला व मार्गदर्शन केले. आज दिवसभरात विकासात्मक प्रशासन आणि तालुका स्तरीय यंत्रणेची विविध योजनांच्या अंमलबावणीमध्ये असणारी भूमिका आणि करावयाची कर्तव्ये या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. सकाळी 10 वाजले पासून ते संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत जवळपास 10 तास बैठक सुरू होती
विविध विभागांछा आढावा घेताना पशू संवर्धन विभागाकडील पशू गणानेचे काम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये डिसेंबर अखेर सुरू झाले पाहिजे या बाबत गट विकास अधिकारी यांना सुचा देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क असावे . संस्थात्मक प्रसूती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना वैयक्तिक स्वाचाता गृहाच उद्दिष्ट १००%साध्य होईल याकडे गट विकास अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे तसेच घान कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिये ची सर्व मंजूर कामांचा अहवाल 27 डिसेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.घरकुल योजनेच्या सर्व निकषांवर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील या करिता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे आणि यामध्ये लाभार्थी व ग्रामपंचायत यंत्रणा यांना सहभागी करण्याच्या सूचना दिल्या. घरकुल पूर्ण करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या
जल जीवन मिशन मध्ये ज्या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत तथापी अद्याप सुरू झाल्या नाहीत त्या गावाच्या पदाधिकाऱ्यांना गत विकास अधिकारी यांनी समक्ष चर्चेला बोलावून कामे सुरू होतील या कडे लक्ष द्यावे अन्यथा या गावाच्या योजनेबाबत गांभीर्यपूर्वक निर्णय घेतला जाईल असा इशाराही दिला. जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांची खाते निहाय चौकशी प्रस्तावित केलेली आहे अथवा ज्यांची खाते निहाय चौकशीची प्रक्रिया सुरू आहे अशी सर्व प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः आढावा घेऊन निकाली निघतील याबाबत दक्षता घ्यावी माननीय विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अहवाल वाचनात दिलेल्या सूचनेनुसार गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत कोणतेही सहानुभूती न बाळगता त्याच्यावर कारवाईबाबत तात्काळ प्रकिया करण्यात यावी. ग्रामपंचायत विभागाकडील आढाव्या दरम्यान पंधरावा वित्त आयोगाचा खर्च आराखड्यानुसार पूर्ण करण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला तसेच तालुकास्तरीय तक्रारींचा त्याच स्तरावर गटविकास अधिकारी यांनी निपटारा केल्यास जिल्हास्तरावर या तक्रारी येणार नाहीत याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशाही सूचना दिली
जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांचे गुणांकन केले आहे. त्यांच्याकडील एकूण कामकाजाच्या मुद्द्यावर 140 गुणांचे गुणांकन करण्यात आले आहेत. त्यानुसार राधानगरी तालुका 86.56 गुनासह प्रथम क्रमांकावर असून कागल तालुका 86.45 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे
सर्वात कमी गुण करवीर तालुक्याला 76.52 आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुणांकन केले असून याच नुसार गट विकास अधिकारी यांच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे
सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयान , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष जोशी प्रकल्प संचालक श्रीमती सुषमा देसाई व जिल्हास्तरीय सर्व खाते प्रमुख आणि तालुक्याचे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते
गट विकास अधिकारी यांचे गुणांकन खालील प्रमाणे आहे
1) राधानगरी - 86.56
2) कागल - 86.45
3) भुदरगड - 86.26
4) गगनबावडा - 83.78
5) शिरोळ - 83.27
6) हातकणंगले - 81.58
7)शाहूवाडी - 80.96
8) आजरा - 79
9) करवीर - 76.52
10) चंदगड - 76.66
11) पन्हाळा - 77.68
12) गडहिंग्लज - 77.94