कोल्हापूर फौंड्री क्लस्टरच्या सभासदासाठी आगामी काळात विविध प्रशिक्षण-चेअरमन दिपक चोरगे
schedule30 Sep 25 person by visibility 71 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूर फौंड्री अँड इंजिनीअरिंग क्लस्टरच्या सभासदासाठी आगामी काळात विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.’असे क्लस्टरचे चेअरमन दिपक चोरगे यांनी सांगितले. कोल्हापूर फौंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिरोली एमआयडीसी येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरुन चोरगे बोलत होते. आमदार अशोकराव माने, क्लस्टरचे वित्त संचालक सुनिल शेळके, तसेच संचालक राजू पाटील, भरत जाधव, नचिकेत कुंभोजकर, मिलिंद भावे, नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर व प्रसन्न तेरदाळकर हे संचालक उपस्थित होते. सभेत ३१ मार्च २०२५ अखेरचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, तसेच संचालकांचा अहवाल व लेखापरीक्षकांचा अहवाल सादर करण्यात आला व सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच नियमानुसार कार्यकाळ पूर्ण झालेल्या संचालकांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन कडील प्रतिनिधी प्रसन्न तेरदाळकर यांची नवीन संचालक म्हणून निवड करण्यात आली. इतर संस्थांकडून मागील संचालकांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.सभेत क्लस्टरच्या कामकाजासाठी सरकारकडून अधिक निधी मिळावा यासाठी आमदार माने यांच्याशी चर्चा झाली.