जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
schedule01 Oct 25 person by visibility 72 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील ३२ जिल्हा परिषद व त्यातंर्गत ३३६ पंचायत समित्यांच सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आरक्षण प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती गणासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया तहसिलदार कार्यालय येथे होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीचा आदेश काढला आहे. जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समित्यामधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी चौदा ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ आहे.प्राप्त हरकती व सूचनावर विचार करुन विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण अंतिम करण्यात येईल. अंतिम आरक्षण तीन नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आरक्षण सोडत व निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.