Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील ६१८ शाळा महिला शिक्षकाविना !  नजीकच्या शाळेतील शिक्षिकेवर किशोरी संवादची जबाबबारी !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्यांच्या कामाची तपासणी करा !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ! रस्त्याचे कामाची तपासणी करा !!ठेकेदाराचा हलगर्जीपणा, कनिष्ठ अभियंत्यांची कर्तव्यात कसूर ! फुलेवाडीतील इमारत दुर्घटना प्रकरण !!जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडतअग्निशमन इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने नेमली समितीसिनेट सदस्याचा पाठपुरावा, विद्यापीठात शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरूअंबाबाई देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजाकोल्हापूर फौंड्री क्लस्टरच्या सभासदासाठी आगामी काळात विविध प्रशिक्षण-चेअरमन दिपक चोरगेकोल्हापुरात चार-पाच ऑक्टोबरला रानभाज्या-सेंद्रिय उत्पादन महोत्सव

जाहिरात

 

ठेकेदाराचा हलगर्जीपणा, कनिष्ठ अभियंत्यांची कर्तव्यात कसूर ! फुलेवाडीतील इमारत दुर्घटना प्रकरण !!

schedule01 Oct 25 person by visibility 234 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर चौकशीत अनेक बाबीत अनियिमतता, ठेकेदाराचा दुर्लक्षितपणा, कनिष्ठ अभियंत्यांची कर्तव्यात कसूर असे प्रकार समोर येत आहेत. डबल हाईट स्लॅब हा दिवसा सर्व आवश्यक तांत्रिक दक्षता घेऊन करणे गरजेचे असताना रात्रीच्या वेळी टाकण्याचा प्रकार ही अनाकलनीय आहे. यामध्ये ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. ठेकेदाराने स्लॅब टाकण्याच्या महत्वाच्या कामासाठी पूर्ण वेळ साईट इंजिनिअर उपलब्ध करुन त्याच्या प्रत्यक्ष पर्यवेक्षणाखाली काम करुन घेणे आवश्यक असताना साईट इंजिनिअर न नेमता फक्त सेंट्रींग ठेकेदाराकडून काम करुन घेतल्याचे समोर येत आहे. दरम्यान ठेकेदार शशिकांत पोवारला पोलिसांनी अटक केली आहे. पोवारच्या विरोधात महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी फिर्यादी होती. ठेकेदार पोवारवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान फुलेवाडी येथील या कामासाठी विभागीय कार्यालय छत्रपती शिवाजी मार्केटकडील कनिष्ठ अभियंता पूर्ण वेळ उपस्थित राहणे आवश्यक असताना त्यांनी सकाळी व सायंकाळी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे कनिष्ठ अभियंता यांनी प्रशासकीयदृष्ट्या हजगर्जीपणा करुन कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे. चौकशी समितीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शहर अभियंना रमेश मस्कर यांनी दिवसभर चौकशी करुन अहवाल तयार केला आहे. चौकशी अहवालाप्रमाणे ठेकेदाराने स्लॅबकरिता शटरींग फॉर्मवर्कबाबत स्ट्रक्चरल इंजिनिअरने दिलेल्या लेखी सूचनाप्रमाणे जागेवर पुर्तता करुन त्याबाबत पुन:श्च स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल घेणे आवश्यक होते. तो अहवाल न घेताच काम सुरु केल्याने संबंधित ठेकेदाराने हलगर्जींपणा केला.

 स्लॅबकरीता काँक्रिटचा माल स्लॅबपर्यंत वाहून नेण्याकरीता ठेवण्यात आलेली काँक्रिट लिफ्ट ट्रॉली ही दोन पोलवर उभारण्यात आली होती. वस्तुत: तांत्रिकदृष्ट्या सदरची ट्रॉली चार पोलवर उभारणे आवश्यक होते. जेणेकरुन ट्रॉलीचा स्लॅबवर दबाव पडणार नाही. याबाबत ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घेतलेली नाही. त्यामुळे झालेल्या व्हायब्रेशनमुळे स्लॅब कॉलमसह कोसळल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे असे चौकशी समितीने म्हटले आहे.  या इमारतीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अग्निशमन सेवा व आणिबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजना (जिल्हास्तर अंतर्गत) महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशन केंद्राचा विकास व कर्मचारी निवास व्यवस्था सुधारणा करणे यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes