+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule07 May 24 person by visibility 151 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ‘प्रचाराच्या कालावधीत मतदारांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधता आला. वाड्यावस्तीवरील नागरिकांपर्यंत संपर्क झाला. या कालावधीत नागरिकांचे जे प्रेम, प्रतिसाद लाभला ते पाहता आपला विजय निश्चित आहे.”अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दिली आहे.
शाहू छत्रपती यांनी मतदानादिवशी दिवसभर विविध मतदारसंघांचा दौरा केला. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर छत्रपती कुटुंबांने मतदान केले. यानंतर शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तर, दक्षिण, कागल, गडहिंग्लज, राधानगरी- भुदरगड, करवीर मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सायंकाळी मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. 
ते म्हणाले, ‘नागरिकांनी ज्या उत्साहाने मतदान केले ते पाहता त्यांना परिवर्तन घडवायचे आहे हे सिद्ध झाले. मी रयतेचा उमेदवार होतो. रयतेनेच माझी उमेदवारी घरोघरी पोहोचवली. आपली वाटचाल विकासाभिमुख राहिल. माझ्या प्रचारासाठी गेले महिना-दीड महिने ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, दिवसरात्र प्रचार केला त्या साऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. महाविकास आघाडीत सहभागी पक्षाचे व मला पाठिंबा देणाऱ्या विविध पक्ष, संस्था-संघटनेचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जे परिश्रम घेतले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ’