+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत adjustआमदार पी. एन. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule08 May 24 person by visibility 777 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य आणि राष्ट़्रीय पातळीवरील नेत्यांचे दौरे, स्थानिक नेते मंडळींची प्रतिष्ठा आणि कार्यकर्त्यांमधील ईर्षा यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी ७१.५९ टक्के तर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ७१.११ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाचा हा वाढीव टक्का कोणाला फायदेशीर ? आणि कोणाला महागात पडणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर आणि कागलमध्ये कमालीच्या चुरशीने मतदान झाले. हातकणंगले मतदारसंघामध्ये हातकणंगले, शिरोळ व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जास्त मतदान झाल्याने कौल नेमका कोणाला याविषयी उत्कंठा वाढली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार संजय मंडलिक व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यामध्ये खरी लढत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चितीपासून प्रचाराचा प्रारंभ या पातळीवर महाविकास आघाडी एक पाऊल पुढे होती. याउलट महायुतीमध्ये उमेदवार निश्चितीचा सावळागोंधळा होता. महायुतीकडून दोन्ही मतदारसंघात उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर बडया नेत्यांच्या सभा आणि दौऱ्यांचा धडाका लावत वातावरण निर्मिती केली. दोन्ही मतदारसंघामध्ये यंदा महायुती व महाविकास आघाडीमध्ये कमालीची राजकीय ईर्षा होती.
कोल्हापुर लोकसभा मतदारसंघासाठी २१५६ मतदान केंद्रावर मतदानाची सोय केली होती.हातकणंगले मतदारसंघात १८३० मतदान केंद्राची व्यवस्था होती. यंदा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनानेही व्यापक प्रयत्न केले. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यावर आधारित संकल्पनेच्या अनुषंगाने मतदान केंद्राची निर्मिती केली होती.
………….
करवीरमध्ये सर्वाधिक मतदान, कागल दोन नंबरवर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ सहा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान करवीरमध्ये झाले. करवीरमध्ये करवीर ७९. ६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कागलमध्ये ७५.३१ टक्के तर कोल्हापूर दक्षिणमध्ये ७०.६९ टक्के मतदान झाले. राधानगरी ६९.७७ टक्के, चंदगड ६८.४१ टक्के , कोल्हापूर उत्तर मतदारसंघात ६५.३१ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकूण १९, ३६, ४०३ मतदारापैकी १३ लाख ८६ हजार २३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
………………………
हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडीत ७० टक्यांहून अधिक मतदान
हातकणंगले मतदारसंघासाठी ७१. ११ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हातकणंगले ७५.३२ टक्के तर शाहूवाडी मतदारंघात ७२.९२ टक्के तर मतदानाची नोंद झाली आहे. इचलकरंजी ६८.१४ टक्के, शिरोळ ७३.६० टक्के, इस्लामपूर ६८.४३ टक्के, शिराळा ६७.३९ टक्के मतदान झाल आहे. एकूण १८ लाख १४ हजार २७७ मतदारांपैकी १२ लाख ९० हजार ७३ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.