+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule07 May 24 person by visibility 342 categoryजिल्हा परिषद
सांगली जिल्ह्यातील साखराळे केंद्रावरील प्रकार, हातकणंगलेसाठी दुपारी तीनपर्यंत ४९.९४ टक्के मतदान
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार -विद्यमान खासदार धैर्यशील माने व महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या गोंधळामुळे दुपारच्या सुमारास काही वेळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटविले. आणि पुन्हा मतदानाला सुरुवात झाली.
साखराळ मतदान केंद्रावर बूथ क्रमांक ६२ व ६३ या केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांचे मतदान प्रतिनिधी बोगस असल्याचा आक्षेप महायुतीच्या कार्यकर्त्यांना नोंदविला. यावरुन महाविकास आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने झाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही आक्रमकपणे महायुतीच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची वाढत गेली आणि प्रकरण हातघाईवर आले. कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्र परिसरातच हाणामारी झाली. यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना हटविले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माने, महाविकास आघाडीकडून पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीकडून डी. सी. पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ४९.९४ टक्के मतदान झाले होते. यामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी ५३.५२, इचलकरंजी ४७ टक्के, इस्लामपूर ४९.६० टक्के, शाहूवाडी ५२.१३ टक्के, शिराळा ४७.४२ टक्के तर शिरोळ मतदारसंघामध्ये ४९.६१ टक्के मतदान झाले आहे.