+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत adjustआमदार पी. एन. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule08 May 24 person by visibility 76 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या  भारतीय वन सेवा परीक्षेत येथील विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी आकाश कदम हा राष्ट्रीय स्तरावर 76 व्या रँकने उत्तीर्ण झाला. 
मूळचा सातारचा असणारा आकाश हा विद्या प्रबोधिनी तर्फे देण्यात येणाऱ्या चंद्रकांत (दादा) पाटील स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीचा विद्यार्थी आहे.
भारतीय वन सेवा ही आयएएस व आयपीएससह मात्र तिसरी ऑल इंडिया सर्व्हिस असून भारतातील वन संरक्षण आणि संवर्धन व वन कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्वात महत्वाची सेवा मानली जाते.
यूपीएससी ने घेतलेल्या मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यांवर तब्बल 28 विद्यार्थ्याना प्रबोधिनीने शिष्यवृत्ती देऊ केली होती.  विद्या प्रबोधिनीचे संचालक  राजकुमार पाटील यांनी प्रबोधनीच्या शिष्यवृत्तीचे या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने सार्थक केल्याचे सांगितले. शिष्यवृत्ती 2024-25 करता देखील देण्यात येणार असून युपीएससीची पूर्व परीक्षा झाल्यानंतर यासाठी विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.