+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत adjustआमदार पी. एन. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल adjustबुद्धिबळ स्पर्धा -दिव्या, दिशा,अरिना, सौदर्या आघाडीवर adjustआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एसजी स्कूलच्या ऐश्वर्याला उपविजेतेपद adjustआंबा महोत्सवला प्रारंभ, विविध 47 जातींचे प्रदर्शन adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule08 May 24 person by visibility 103 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड येथील नवीन उंच टाकीला क्रॉस कनेक्शन करणेचे काम शुक्रवारी, (दहा मे २०२४) हाती घेणेत येणार आहे. यावेळी कावळानाका उंच टाकीवर अवलंबून असणा-या भागातील पाणी पुरवठा होणा-या नाही. या कावळा नाका टाकीवर अवलंबून असलेल्या भागामध्ये नागरीकांना शुक्रवारी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच शनिवारी, ११ मे  रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. यामध्ये कावळानाका टाकीवर अवलंबून असणा-या शाहूपुरी व्यापार पेठ ते चौथी गल्लीपर्यंत, पाच बंगला परिसर, साईक्स एक्सटेन्शन, रुईकर कॉलनी, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, स्टेशन रोड, घोरपडे गल्ली, महावीर गार्डन परिसरपर्यंत, न्यू शाहूपुरी, पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, घोडकेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत, सह्याद्री सोसायटी, गणेश कॉलनी, आयोध्या कॉलनी इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.