कृषी प्रदर्शनात पंधरा कोटीची उलाढाल ! स्टॅलिन घोडा, ३०० अंडी देणारी कोंबडी ! !
schedule23 Feb 25 person by visibility 54 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रविवार, सुट्टीचा दिवसाचे औचित्य साधून नागरिकांनी भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली. प्रदर्शनाच्या तीन दिवसाच्या कालावधीत पंधरा कोटीच्या आसपास उलाढाल झाली. या प्रदर्शनात विविध जातीचे पशू-पक्षी आकर्षण ठरत आहेत. ३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी, जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा, टर्की कोंबडा दीड वर्षाचा बारा किलो वजनाचा आहे. कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन सुरू आहे. सोमवार (२४ फेब्रुवारी २०२५) अखेर हे प्रदर्शन खुले आहे.
प्रदर्शनात पांढरे ससे, आफ्रिकन बर्ड सिल्की कोंबड्या, चिनी कोंबडी, सोनाली कोंबडी, गिरीराज कोंबडी, परशियन मांजर ची पिल्ले कबूतर लव बर्ड कोकोटोल बर्ड,अमेरिकन बिल्टम जातीचे बोकड तीन वर्ष आठ महिने आणि चार वर्षाची १८ इंचाचे बोकड, कोलंबियन ब्रम्हा एक वर्षाचा कोंबडा त्याचे साडेचार किलो वजन आहे.गीज बदक,व्हाईट पिक अँन बदक, इंडियन रनर बदक, मस्कवि बदक आकर्षण ठरत आहेत जे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने भीमा कृषी प्रदर्शनात ऊस उत्पादन वाढीसाठी सुपर केनर्सरी द्वारे ऊस रोप तयार करणे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गतसामूहिक शेततळे प्लास्टिक आच्छादन हरितगृह कांदाचाळ रायपनिंग चेंबर शीतगृह पॅक हाऊस शेडनेट हाऊस फलोत्पादन यांत्रिकीकरण असे विविध प्रोजेक्ट मांडले आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ होणार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या सह प्रमुख उपस्थिती आमदार.चंद्रदीप नरके,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजीराव पाटील,आमदार अशोकराव माने उपस्थित असणार आहेत.
……………….
तीन दिवसातील उलाढाल
प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सेंद्रीय गुळाची विक्री झाली. २५०० किलो गुळ विक्री झाली आहे. तर इंद्रायणी तांदूळ ४५०० किलो, आजरा घनसाळ ३८००, रत्नागिरी तांदूळ ३००० किलो, सेंद्रीय हळद ११५० किलो, नाचणी एक हजार किलो, विविध बी बियाणे १२०० किलो इतकी विक्री झाली. या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे