सात किलोचे कलिंगड, चार किलोचा मुळा, अडीच फूट लांबीचा हरभरा !
schedule22 Feb 25 person by visibility 132 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सात किलो वजनाची मैलोडी जातीचे कलिंगड, रेशीम कोष, शंकरवाडी कागल येथील चार किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड, कडेगाव येथील ८६०३२ या वाणाच्या उत्पन्नापेक्षाही ज्यादा उत्पन्न देणारा १३००७ ऊसाची नवीन वाण आकर्षण ठरत आहे. पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय नावाचा हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा... हे आकर्षण ठरत आहे, मेरी वेदर मैदानावरील भीमा कृषी व पशू-पक्षी प्रदर्शनाचे !
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती भीमा कृषी प्रदर्शनात मिळत आहे. व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येत आहेत. यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे. शनिवार, हा प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता. या प्रदर्शनात मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा, चायना झिंग जातीचा बोकड, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे बैल,पाच वर्षाची देवणी गाय, कंधारी वळू, आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर मेंढी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
भीमा फार्म मधील पांढरे घोडे, पुंगनूर जातीची चार वर्षाची अडीच फूट तीन गाय, नांदेड येथील अजय विश्वनाथ जाधव यांच्या मालकीच लाल कंधारी वळू खास आकर्षण ठरत आहेत याचबरोबर चेतक सहा वर्षाचा घोडा, बेळगाव येथील सुजित शिवकुमार देशपांडे फार्म मधील मैशी आणि घोडे पंढरपुरी जातीचा रेडा हासेगाव वाडी लातूर येथील पाच वर्षाची देवणी गाय, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू बैल आकर्षण ठरत आहे तो सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे.कोगील बुद्रुक येथील साडेतीन वर्ष वय असलेला सहाफूट उंची असलेल्या सोन्या नावाचा बैल आकर्षण आहे.
हेरले येथील अमोल चौगुले यांचा पावणेसात किलोचा केळीचा घड, तेराशे सात उसाचे पाडगाव येथील वाण अर्जंनि येथील सात किलो मैलोडी जातीचे कलिंगड,६.८०० किलो वजनाचा कोहळा,पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा हे प्रदर्शनाचे वेगळेपण ठरत आहे.