खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांच्यासमवेत लवकरच बैठक, माणिक पाटलांनी उपोषण सोडले
schedule24 Feb 25 person by visibility 83 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह पक्षकार, सेवाभावी संस्था, संघटना गेले कित्येक वर्षे आंदोलन करीत आहेत. कोल्हापुरवासियांचा खंडपीठ हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, याबाबत सरकार सकारात्मक असून जिल्ह्यातील प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर बैठक घेणार आहेत. अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
पालकमंत्री आबिटकर, खासदार धनंजय महाडिक यांनी दसरा चौकात उपोषण स्थळी भेट देऊन पदवीधर मित्र संस्थेचे माणिक पाटील-चुयेकर यांना उपोषण सोडण्यास सांगितले. पाटील हे गेल्या नऊ दिवसापासून खंडपीठासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांनी, पालकमंत्री आबिटकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले. यावेळी मंत्री आबिटकर यांनी जिल्ह्यात खंडपीठ व्हावे म्हणून माझ्यासह, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला असून सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्य समवेत होणाऱ्या बैठकीत खंडपीठापबाबत स्थापनेसाठी सकारात्मक नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, आमादर अशोकराव माने, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, अॅड. शिवाजीराव मोहिते, गोकुळचे संचालक अजित नरके, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.