Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा एप्रिलमध्ये अमृतमहोत्सवी वाढदिवस, विविध कार्यक्रमांचे आयोजन खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांच्यासमवेत लवकरच बैठक, माणिक पाटलांनी उपोषण सोडलेगोकुळ कट्टा सांगणार दूध उत्पादकांची यशोगाथा !    उद्योग जगतासाठी पायोनियर उपक्रम आवश्यक ! स्वत:च्या पॅशनला जपा, नक्की यश मिळणार !!कोजिमाशि पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्वच्छ - सुंदर शाळा पुरस्कार वितरण !! कृषी प्रदर्शनात पंधरा कोटीची उलाढाल ! स्टॅलिन घोडा, ३०० अंडी देणारी  कोंबडी ! !खंडपीठप्रश्नी मुख्यमंत्र्यांची सोमवारी भेट घेणार ! राजेश क्षीरसागरांनी दिली माणिक पाटलांच्या आंदोलनस्थळी ग्वाही !!सात किलोचे कलिंगड, चार किलोचा मुळा, अडीच फूट लांबीचा हरभरा !कोल्हापूर जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी आम्ही सोबती घरकुल मोहिम –पालकमंत्री प्रकाश आबिटकरकेआयटीत पायोनियर-२५चे दिमाखात उद्घाटन, ३५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जाहिरात

 

कोजिमाशि पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्वच्छ - सुंदर शाळा पुरस्कार वितरण !!

schedule24 Feb 25 person by visibility 51 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेचा सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' पुरस्कार प्राप्त शाळांचा सन्मान करण्यात आला. स्वामी विवेकानंद कॉलेज परिसरात  डॉ बापूजी साळूंखे स्मृती भवन कोल्हापूर येथे नुकताच हा कार्यक्रम झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी ॲड. धनजंय पठाडे होते.

प्रमुख पाहुणे  म्हणून विशेष लेखाधिकारी किरण पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री जाधव, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार उपस्थित होते.

पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी कोजिमाशि पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सभासद हिताच्या योजनांची माहिती सांगितली. कर्जमुक्ती योजना, गुणवंत विद्यार्थी सत्कार व भक्कम आर्थिक प्रगतीचा आढावा  घेतला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ' मुख्यमंत्री माझी शाळा  सुंदर शाळा ' पात्र ४० शाळांना मानपत्र, भिंतीवरील घड्याळ, प्लास्टिक समृद्धीची बादली देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मयत सभासदांचे वारसाना कर्ज मुक्ती योजनेतून कर्ज माफी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दहावी - बारावी परीक्षा गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी,  शासकीय स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तर खेळाडूचा सत्कार पारितोषिक ,सन्मानचिन्ह व रोख १००० रुपये देऊन  सुमारे ३०३ विद्यार्थ्याना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पठाडे म्हणाले, कोजिमाशि पतसंस्थेने सभासद हिताच्या अनेक योजना राबवून आदर्शवत कारभार केला आहे असे प्रतिपादन केले  
   कोजिमाशिचे चेअरमन राजाराम शिंदे, व्हाइस चेअरमन शरद तावदारे, सीईओ जयवंत कुरडे,  संचालक लक्ष्मण डेळेकर, अनिल चव्हाण, डॉ. डी एस घुगरे, राजेंद्र रानमाळे,श्रीकांत कदम, दिपक पाटील, मनोहर पाटील, सचिन शिंदे, ऋतुजा पाटील, मदन निकम , प्रकाश कोकाटे, श्रीकांत पाटील , उत्तम पाटील,  पाडूरंग हळदकर, अविनाश चौगले, सुभाष खामकर, जितेंद्र म्हैशाळे, राजेन्द्र  पाटील, शितल हिरेमठ, तज्ज्ञ संचालक आनंदा व्हसकोटी, उत्तम  कवडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.  एस पी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes