गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा एप्रिलमध्ये अमृतमहोत्सवी वाढदिवस, विविध कार्यक्रमांचे आयोजन
schedule24 Feb 25 person by visibility 423 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस तेरा एप्रिल 2025 रोजी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवस सोहळा साजरा करण्याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याची बैठक ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयामध्ये पार पडली. आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, विश्वास पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातील ५० वर्षात शिरोली दुमालाचे उपसरपंच ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन असा या प्रवासात सहकार, समाजकारण व राजकारणात अमूल्य योगदान दिले आहे. सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेल्या तसेच गेली चार दशके गोकुळ दूध संघ, कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे, रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ, कोल्हापूर या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाची गंगा गावोगावी पोचविण्याचे काम केले असून अशा अजातशत्रू व्यक्तिमत्वाचा ७५ वा वाढदिवस एप्रिल महिन्यात होत असून हा भव्य असा सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव सोहळा घेऊ.
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले , गोकुळ दूध संघाच्या वाटचालीमध्ये विश्वास पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. करवीर तालुक्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे विणण्याचे भरीव काम केले आहे.त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमिताने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करू.
या बैठकीमध्ये विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समिती चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील तंज्ञ मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रम, दुध उत्पादकांना प्रोत्साहनसाठी जास्तीत जास्त दूध देणारी गाय व म्हैस या संबंधीची ‘आबाजीश्री’ स्पर्धा, युवकांसाठी योग शिबिरे, कुस्ती स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे ठरले तसेच गौरव अंक प्रकाशित करण्यात येणार आहे. १३ एप्रिल २०२५ रोजी करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे राज्याचे मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मान्यवर यांच्या हस्ते सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव सोहळा घेण्याचे सर्वानुमते ठरले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, केरबा भाऊ पाटील (कोथळी) बाबासाहेब देवकर (गाडेगोंडवाडी), श्रीमती उदयानीदेवी साळोखे (वाशी), सुनिल पाटील (वडणगे) एस.डी.जरग (महे), अमर पाटील (शिंगणापूर), युवराज गवळी (पाचगाव) यांनी मनोगते केली. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी स्वागत तर संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, उदयसिंह पाटील (कौलवकर), यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, शेकापचे क्रांती पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, एम.आर.पाटील कुरुकलीकर, सदाशिव चरापले, कृष्णात पाटील राशिवडेकर, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाजीराव शेलार, विलास पाटील, शिवसेना (उभाठा) गटाचे बाजीराव पाटील शियेकर, शशिकांत खोत (कणेरीवाडी), प्रदीप झांबरे (गडमुडशिंगी), सागर पाटील (निगवे खा.), सुयोग वाडकर (खेबवडे), शंकर पाटील (गोकुळ शिरगाव), मोहन सालपे (क.बावडा), अर्जुन इंगळे (कणेरी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर जांभळे (बालिंगा), शेतकरी संघटनेचे दादू कामीरे, बुद्धिराज पाटील (महे), भगवान लोंढे (सांगरूळ), शेतकरी संघ संचालक जी.डी.पाटील (पाडळी), कृष्णात चाबूक, दिलीप खाडे (सांगरूळ), पांडुरंग काशीद (यवलूज), एकनाथ पाटील (इस्पुर्ली), करवीर माजी प.स.सदस्य दत्तात्रय मुळीक उपस्थित होते.