जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या ! मनिषा देसाई, अरुण जाधवांचा समावेश !!
schedule15 Jul 25 person by visibility 190 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ए देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्या बदल्या झाल्या. ग्रामविकास विभागाने बदल्यांचे आदेश काढले आहेत. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव डॉ. उर्मिला जोशी यांच्या स्वाक्षरीनिशी बदली आदेश निघाले आहेत.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांची बदली गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली. देसाई यांच्या बदलीने रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओ. पी. यादव यांच्या नियुक्तीचे आदेश आहेत. यादव हे परभणी जिल्हा परिाषदेत सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांची बदली गटविकास अधिकारी कुडाळ पंचायत समिती येथे झाली. जाधव यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर नंदूरबार पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी जे.डी. उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कसबा बावडा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्रीमती डी. एस. पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी झाली आहे. दरम्यान त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी श्रीमती श्वेता काळे –यादव यांची नियुक्ती झाली आहे. काळे या परभणी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या होत्या.