दिलीप पोवार, उत्तम कोराणेसह 55 जण भाजपमध्ये, मुंबईत प्रवेशाचा धमाका ! मुश्रीफांना धक्का!
schedule15 Jul 25 person by visibility 895 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरात सर्वच पक्षाने इनकमिंगसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या पाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही इनकमिंगचा धमाका उडविला. काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह जवळपास 55 जणांनी मंगळवारी (15 जुलै 2025 ) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी नगरसेवक जयंत पाटील, मुरलीधर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.आगामी महापालिका निवडणूक महायुतीतर्फे लढविण्याच्या घोषणा महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी वारंवार केले आहे त्याचवेळी इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग ही सुरू केले आहे. शिवसेना शिंदे पक्षातर्फे यापूर्वी दोनदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला यामध्ये माजी महापौर सुनील कदम निलोफर आजरेकर स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह 25 हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला
भारतीय जनता पक्षाशी निगडित असलेल्या काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली . तो भाजपसाठी धक्का मानला जात होता. दरम्यान शिवसेनेच्या पाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातील माजी नगरसेवकांना सामावून घेण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुंबईत अनेक जणांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षासोबत असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरस्वती पवार यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते व नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या उत्तम कोराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी धक्कादायक मानला जातो. उत्तम गोराणे हे कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे सक्रिय नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र भाजपाने कोराणे यांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे.