गोकुळतर्फे ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
schedule15 Jul 25 person by visibility 35 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सेवेतून सेवानिवृत्त ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालय येथे कार्यक्रम झाला.
चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या प्रगतीसाठी कर्मचारी यांनी आपल्या संघ सेवेतून मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची शिस्त, सचोटी आणि संघाशी असलेली नाळ ही सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही गोकुळशी असलेलं नातं तुटत नाही, उलट ते अधिक भावनिक आणि बंधुत्वाचं होते.
यावेळी आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल कुस्तीपटू प्रथमेश सुर्यकांत पाटील (बानगे) व नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल हर्षवर्धन अजित माळी ( म्हाकवे ) यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान सेवानिवृत्त कर्मचा-यांमध्ये माणिक डवरी, सर्जेराव पाटील, रामचंद्र चव्हाण, कोंडीबा पाटील, रंगराव चौगुले, रघुनाथ चौगुले, आनंदा स्वामी, सातापा पारळे, आकाराम पाटील, संभाजी पाटील, सुखदेव सुळकुडे, राजाराम पाटील, चंद्रशेखर घाळी, गजानन मुचंडी, जयवंत पाटील, भागोजी दळवी, अशोक परीट, बाजीराव कणसे त्याचबरोबर इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना श्रीफळ, गोकुळचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.