कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय डिक्रूज, उपाध्यक्षपदी अॅड. नेताजी पाटील
schedule15 Jul 25 person by visibility 55 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय डिक्रूझ, उपाध्यक्षपदी अॅड. नेताजी पाटील, सचिवपदी अॅड. यशदीप इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २०२५-२६ या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत. याप्रसंगी कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये सहसचिवपदी अॅड. मनोज कदम, लोकल ऑडिटरपदी अॅड. मृणाल जाधव, महिला प्रतिनिधी म्हणून अॅड. शिवानी पोवार यांची निवड झाली.असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. व्ही एस चव्हाण, अॅड. के. व्ही. पाटील, अॅड. संदीप व्ही. घाटगे, अॅड. के. डी. पोवार, अॅड. किरण प्र. मुंगळे, अॅड. प्रबोध मा. पाटील, अॅड. नामदेवराव साळोखे, अॅड. इंद्रजीत एस. चव्हाण उपस्थित होते. अॅड. विशाल सरनाईक यांनी आभार मानले.