बदलीस पात्र शिक्षकांना पर्याय निवडण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत अर्जाची मुदत
schedule15 Jul 25 person by visibility 28 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये एकूण ३४२६ शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान संवर्ग एक मधील शिक्षकांना १५ जुलै २०२५ अखेर बदलीकरिता पर्याय निवडण्यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे.
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक अंतर्गत बदलीस पात्र शिक्षकांची संख्या १६१० इतकी आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग दोनमध्ये बदली पात्र शिक्षकांची संख्या ६९ आहे. रॅंडम राऊंडमध्ये २१२८ शिक्षकांचा समावेश आहे. बारा जुलै ते १५ जुलै या अखेर विशेष संवर्ग शिक्षक भाग मध्ये समावेश असलेल्या शिक्षकांना बदलीसाठी पर्याय निवडण्यासाटी अर्जकरण्यची मुदत दिली होती. या संवर्गातील शिक्षकांचे बदलीसाठी प्राधान्यक्रमनुसार यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा प्रसंतीक्रम विचाराता घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यक्रमानुसार शित्रकांची बदली करण्यात येणार आहे.
जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमापमणे एकाही शाळेमध्ये बदली देता आली नाही तर तयची बदली विशेष संवर्ग एकमधून होणार नाही. तथापि त्याने विशेष संवर्गभाग एक अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झालयास तसेच अशा शिक्षक पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहतो. संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये समावेश असलेलय शिक्षकांनी बदलीसाठी पर्याय निवडल्यानंतर निवडलेल्या पर्यायांची पडताळणी करुन आपला अर्ज अंतिम करुन ऑनलाइन पोर्टलवर सबमिट झाल्याची खातरजमा करावी. तसेच अंतिम केलेल्या अर्जाची हार्डकॉपी जतन करुन ठेवावी असे आवाहन शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे.