गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रोहित बांदिवडेकर, उपाध्यक्षपदी सदानंद घाटगे
schedule15 Jul 25 person by visibility 31 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रोहित बांदिवडेकर व उपाध्यक्षपदी सदानंद घाटगे यांची निवड करण्यात आली. शहर उपनिबंधक डॉ. प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली.अध्यक्षपदासाठी बांदिवडेकर यांचे नाव संचालक रविंद्र पंदारे यांनी सुचविले. त्याला संचालक मधुकर पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी घाटगे यांचे नाव संचालक शशिकांत तिवले यांनी सुचविले. त्यास संचालक अतुल जाधव यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकेका संचालकांचे अर्ज दाखल झाले. यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी संचालक अरविंद आयरे, विलास कुरणे, रमेश घाटगे, अजित पाटील, संजय खोत, किशोर पोवार, प्रकाश पाटील, हेमा पाटील, मनुजा रेणके आदी उपस्थित होते.