महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पॅरिस ओलंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यांनी देशाची, राज्याची शान वाढविली. जिल्हा, तालुका व गावाचे नाव जगभर पसरविण्याचे काम केले. स्वप्नील एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे याचा आम्हास अभिमान आहे. अशा भावना कास्ट्राइब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या शौर्याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे व त्यांच्या आई यांचा गौरव कास्ट्राईब महासंघाचे नेते नामदेवराव कांबळे, जिल्हा अध्यक्ष गौतम वर्धन, जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डुकर , कोषाध्यक्ष पी डी सरदेसाई, मार्गदर्शक तानाजी घस्ते , बाबासो कांबळे, आजरा अध्यक्ष विजय कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.