शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी सुरेश गोसावी
schedule10 Oct 25 person by visibility 2077 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. राजभवन कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. यामुळे गेले तीन दिवस कुलगुरूविना असलेल्या शिवाजी विद्यापीठाला शुक्रवारी कुलगुरू लाभले . माजी कुरुगुरु डी.टी शिर्के यांचा 6 ऑक्टोबर 2025 रोजी कुलगुरूपदाचा कार्यकाल संपला. त्यांच्यासह प्रकुलगुरू पी एस पाटील यांचाही कार्यकाल संपला. सोबत विद्यापीठातील चार अधिष्ठाता यांना अधिष्ठाता पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गोसावी हे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एमएससी, पीएचडी पदवी मिळवली आहे. जून 2023 मध्ये त्यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरीपदी नियुक्ती झाली आहे .